Tuesday 22 September 2015

जाणुनिया न सत्य

जाणुनिया न सत्य,
सांगती ती असत्ये,
असत्यास ती मानती ती सत्य ,
घोळ हा सारा हा त्या सत्याचा ,
काळोखी सत्य समजे
प्रकाशितास असत्य समजे
किती दुर्भाव होई
मग सत्य हि पापण्या वरी
अन डोळ्या समोरील असत्य ते सत्य म्हणूनिया स्वीकारी
-राष्ट्रपाल काकडे

Tuesday 15 September 2015

कविता : गर्ज पण बरस

कविता : गर्ज पण बरस 

-राष्ट्रपाल काकडे (माझा दृष्टीकोन )

कविता : गर्ज पण बरस 


-राष्ट्रपाल काकडे
(माझा दृष्टीकोन )

Thursday 7 May 2015

बुद्ध म्हणजे काय ?


बुद्ध म्हणजे काय ? 





            बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा ; सम्यकसंबुद्ध , किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा तसेच त्यांस सर्वज्ञ किंवा अमर्याद ज्ञानी असे हि म्हणतात . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे नाव आहे .मनाची अशी अवस्था कि , जी मानसिक विकासाच्या अति उच्च  शिखरावर पोहचलेली आहे.बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपुर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते .बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करीत .दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत , त्यानंतर सम्यक संबुद्ध होत.




         पहिल्या अवस्थेत मुदिता (आनंद ) दुसरया अवस्थेत विमलता (शुद्धता) त्यानंतर प्रभाकारी (तेजस्विता) , अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) , सुदूर्जया (जिंकण्यास कठीण) , अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), दुर जाणे , अचल (अढळ ) , साधुमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे ) आणि दहाव्या अवस्थेत धर्ममेध जाऊन त्यांस बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते .तेव्हा त्यांस बुद्ध म्हणतात      

Friday 3 April 2015

बौद्ध संस्कृती


बौद्ध संस्कृती 

     बौद्ध संस्कृती असे कानी पडताच , काही  वैशिष्ट्य चटकन माझ्या डोळ्या समोर आले.भारताच्या भौगोलिक विस्तारणा प्रमाणेच बौद्ध संस्कृती विशाल आहे .या संस्कृतीमध्ये प्रत्येकास स्थान , विचार , हित , विशाल व समतामयी दृष्टीकोनातून बौद्ध संस्कृतीची घडण झालेली आहे .या संस्कृतीचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते कि हि संस्कृती केवळ मानवाचाच विचार करते असे नाही तर ती मानवाप्रमाणेच प्राणीमात्रांचा हि विचार करते .बौद्ध संस्कृतीने सर्वांना आश्रय दिला आहे .विरोधकांना हि आपल्या सम्यक व करुणामयी हृदयात सामावून घेतले जाते.अनेक साम्राज्याचे उदयास्त बौद्ध संस्कृतीने पहिलेले आहे.पण , बौद्ध संस्कृतीच्या जीवनाचा झरा अद्याप आटलेला नाही .म्हणून "बौद्ध संस्कृतीला" 'एस धम्मो सनन्त नो' अर्थात 'प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती ' फार हितावह सुखावह संस्कृती म्हणून जगाने गौरविले आहे.तसे तर बौद्ध संस्कृति शब्दात मांडणे कठीणच आहे माझ्यासाठी...


©rashtrapal kakde