Friday 17 October 2014

Hacking एक व्यसन

Hacking एक व्यसन





     माणसाला ज्या प्रमाणे तंबाखू ,गुटखा ,धुम्रपान ,मद्यपान,Drux ई.चा सेवन करणाऱ्या व्यक्तीस आपण व्यसनी बोलतो.या व्यसनी लोकांना शारीरिक इजा पोहचतात.त्यात त्याचं स्वताचाच नुकसान ते स्वतच्या हातून करून घेतात .
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन            Hacking करणारा व्यक्ती हा स्वताला हुशार समजत असतो .तो नव नवीन शोध घेत राहतो .त्या तंत्रातील उणीवा जाणून घेतो .Hacking करणारी व्यक्ती तितकीच व्यसनी असते जितकी एखादी बिडी पिणारी व्यक्ती बिडीसाठी असते.ज्या  प्रमाणे एखाद्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला एखादा दिवसी धुम्रपान न केल्यास राहवत नाही .त्या प्रमाणेच Hackers ला हि एखादा दिवस Hacking केल्याशिवाय राहवत नाही .
      बिनव्यसनी व्यक्ती व्यसन करणाऱ्या एखादाला पाहूनच व्यसनी बनते .मग ते टीव्ही वर एखादा अभिनेता असो वा घरातील कोणी नातेवाईक अथवा मित्र .ते व्यसन करताना पाहून बिनव्यसनी व्यक्तीच्या हि मनात येते कि काय मिळते यांना व्यसन करून आपण हि एकदा धुम्रपान करून बघूया असा विचार मनात येतो.तेंव्हा सुरुवातीला ठसका जो लागतो तो जीवघेणा वाटतो .तो लागणारा ठसका आपल्याला सावध करते शरीरास धोका आहे म्हणून पण तरी हि त्या ठसक्य नंतर ते व्यसन करावे कि नाही हा विचार त्या व्यक्तीच्या विचारसरणी वरून ठरतो.जर त्याला धुम्रपान करावेसे वाटले तर तो मग त्याचे दुष्परिणाम माहित असून सुद्धा धुम्रपान करु लागतो .
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन       तसेच जर Hackingचा विचार केला असता हकिंग चे व्यसन हि एखाद्या व्यक्तीला तेंव्हाच लागते जेंव्हा टी व्यक्ती एखाद्याला व्यसन ते करताना पाहते .Hacking हे व्यसन हुशार आणि कपाळकरंट्या विद्यार्थ्याला हि लागते.त्याला कारणीभूत आहे.सध्याच तांत्रिक युग.नवनवीन Gadget वापरून पाहन तसेच दुसरयाला समजन्या आधी स्वत त्यात पारंगत होणे आणि त्यातील उणीवा कमी पणा सांगणे .असा विचारसरणी असणारे लोक जास्त करून Hackingचे व्यसनी बनतात .मग ते फ्री इंटरनेट कसे मिळवायचे ? मोबाईल फोन ट्रेस कसा करायचा ? वेबसाईटचा DATA BASE कसा बदलायचा ? Malware कसा रन करायचा कसा बनवायचा ? दुरयाचे अकाऊन्त कसे वापरायचे? असे अनेक प्रश्नाची उत्तर शोधण्याची जशी सुरुवात होते तसे तसे हे व्यसन त्या व्यक्तीस जडायला लागते .मग गुगलवर शोध घेते ती व्यक्ती तेंव्हा गुगल वरील प्रात्यक्षिके पाहून ती व्यक्ती प्रात्यक्षिकाप्रमाणे हि करून पाहते.पण कित्येकदा असे संपूर्ण ज्ञान नसताना काही आज्ञायन Hackers पकडले जातात .त्यांचे आयपी ब्लॉक केले जातात. जेंव्हा ते पकडले जातात तेंव्हा त्यांची अवस्था बिनव्यास्नी व्यक्तीला धुम्रपान करताना लागलेला पहिला ठसका अशी अवस्था असते.तेंव्हा पुन्हा Hacking करायची कि नाही हा विचार त्या व्यक्तीने गरजेचे असते .मात्र कित्येक वेळा काही व्यक्ती Hacking करणे बंद करतात पकडल्या गेल्या नंतर .पण काही व्यक्तींना त्या Hacking विषयी कुतुहूल ,अजून जाणून घेण्याची
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन इच्छाशक्ती प्रबळ होते तेंव्हा त्या व्यक्ती हकिंगला पुन्हा सुरुवात करतात.तेंव्हा त्यांना एक प्रश्न पडलेला असतो कि अचूक पणे Hacking कशी करता येईल मग ती व्यक्ती एका सायबर ग्रुपला जॉईन होते .मग खरया अर्थाने Hacking ती व्यक्ती सुरुवात करते.मग ज्या प्रमाणे जास्त धूम्रपानाने त्या व्यसनी व्यक्तीला कर्करोग होतो जो हळू हळू जीव घेतो .त्या प्रमाणेच Hacking चे आहे .कित्येकदा Hacking करणाऱ्या व्यक्ती व्यक्तीमध्ये भांडणे होतात मग ती भांडणे सीमा पातळीची असतात तर काही प्रादेशिक आंतरराष्ट्रीय हि असतात . जस जसे व्यक्ती Hacking मध्ये पारंगत होते तसं तसे ती व्यक्ती केंव्हा जागतिक पातळीची Hacking करायला लागते हे त्या व्यक्तीला हि कळत नाही.त्य प्रमाणे धुम्रपान करणारी व्यक्तीने कधी सिगरेटचा BRRAND बदलला हे त्याला कळत नाही..
       मग कधी चुकून त्या व्यक्तीचा MAC IP / ACESS Crack  हा Ethical Hackersला कळतो मग संपूर्ण जग त्या व्यक्तीच्या मागे लागते .जसे कर्करोग त्या  धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागतो .एके दिवसी मग कर्करोग त्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा बळी घेतो त्या प्रमाणेच Hacking करणाऱ्या व्यक्तीच संपूर्ण आयुष्य धोक्यात येते . द्रकस घेणारया व्यक्तीने जर एके दिवसी द्रक्स घेतले नाही तर त्याची जी मानसिक अवस्था होते तशीच अवस्था Hacking करणाऱ्या व्यक्तीने Hacking करण थांबविल्यावर त्या हकेरची होते .कारण Hacking करणाऱ्या व्यक्तीच Hacking हे एक passion बनलेलं असते आणि एक व्यसन.त्या समोर फक्त Coding,Programing vernabliety , Bugs,how to get new Method आणि Tricks इतकेच त्याच्या डोळ्यासमोर असते.Hacking हे इतके वाईट व्यसन आहे जे करताना सापडले तर कारावास होतोच त्याच बरोबर आर्थिक नुकसान भरून द्यावे लागते आणि सर्वात मोठे नुकसान असे कि न्यायालय आपले सारे प्रमाणपत्र निकामी करतात आणि काहींनी त्या व्यसनात अति व्यसन करून पाहता मोठ्या जागतिक पातळीचा गुन्हात सापडता काही वेळा अशा हच्कर ला स्वताच जीव हि गमवावा लागला .        

mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन
Hacking हे व्यसन वाईट आहे असे मी म्हणत नाही फक्त इतकेच सांगू इच्छितो कि Hacking करायला आवडत ना तुम्हाला तेंव्हा इतकाच विचार करा कि ज्या व्यक्तीने ते Software ,वेबसाईट बनविताना आलेले कष्टाचा हि विचार करावा.आपल्या देशाचा गुप्त डेटा सुरक्षित कसा ठेवता येईल त्याचा विचार करावा .हे सर्व काम आपण सरकार मान्य करू शकतो .तेंव्हा आपण सायबर सुरक्षा पाहणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन सायबर सैनिक म्हणून काम करू शकाल.आणि ते व्यसन तेंव्हा देशाच्या हितासाठी सोयीस्कर ठरेल .तेंव्हा हे एक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जोडीने तुलना करताना लोक हि तुलना करण्या आधी विचार करतील .

©copyrights Reserved by mazadrushtikon.blogspot.in

Tuesday 14 October 2014

पहिले संशोधक


पहिले संशोधक 

जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित धम्म म्हणून बौद्ध धम्माकडे पहिले जाते  तसेच त्या धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणने काही चुकीच ठरणार नाही याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . असे मला वाटते.

    जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित धम्म म्हणून बौद्ध धम्माकडे पहिले जाते  तसेच त्या धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणने काही चुकीच ठरणार नाही याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . असे मला वाटते. बौद्ध धम्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि तथागात यांना आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे. अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple  कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director आदरणीय स्टीव्ह जॉब हे होते.अलीकडच्या काळात त्याच निधन झाल. पण त्या पूर्वी सतत अपयश पाहून खचलेले स्टीव्ह जॉब यांनी बुद्धांविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेले स्टीव्ह बुद्ध विचारांना शरण आले.अपयशाने खचलेला स्टीव्ह बौद्ध धम्माच्या सिद्धांताने एवढे  बदलून गेले कि , बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान ते वाचू लागले.बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्यांनी बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण सापडले व  मार्ग हि सापडला .बुद्धांनी सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याना इतकी भावली किApple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती.जेव्हा ते परत आपल्या देशात अमेरिकेला गेले तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली 
जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित धम्म म्हणून बौद्ध धम्माकडे पहिले जाते  तसेच त्या धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणने काही चुकीच ठरणार नाही याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . असे मला वाटते.आणि Microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक नाव मिळविले त्याचे श्रेय त्यानी फक्त तथागत गौतम 
बुद्धांना दिले. जगातील atomic modeअर्थात अणु संरचना नील आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतो तरीही त्यांनी प्रत्यक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला.पण २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाही अनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते .
“ In Atomic Model built by the centrally situated nucleus and revolving electron around it

       तथागतांनी शिष्यांना उपदेश करताना Atomic Model सांगीतले होते , केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण-घेवाण होत असते.याचाच अर्थ हा आहे कि नीलच्याही अगोदर हि रचना तथागतांनी मांडलेली होती म्हणून नीलसारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतात. ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असतील किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल . 

                     "The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force."


जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित धम्म म्हणून बौद्ध धम्माकडे पहिले जाते  तसेच त्या धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणने काही चुकीच ठरणार नाही याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . असे मला वाटते.      बुद्धानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात उल्लेख केला आहे. अल्बर्ट आईनस्टाइनने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . तथागत म्हणतात मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या चाचणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्य मत पडताळून पहा . यातच  सापेक्षवादाचा सिद्धांत आहे.असे अल्बर्ट आईनस्टाइन हि म्हणतो. Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे.
      Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते.त्याच क्षमन कधीच होत नाही.भूतलावर त्याचे भांडार जेवढे आहे ,तेवढेच राहते. त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही . हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system . Newton चे संशोधन बुद्ध धम्माच्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं.
त्यामुळे मला बुद्ध हे जगातील पहिले संशोधक आहेत असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. बुद्धांनी वैज्ञानिकच नव्हे तर मानवाचाच्या मनातून उगम पावणाऱ्या भावना ,सुख ,दुख याचे उगमस्थान हि शोधून काढले.

व्हिडीओ एडिटिंग


व्हिडीओ एडिटिंग 


      प्रसार माध्यमातून एखादी माहिती प्रसारित करायची असते .तेंव्हा ती विविध प्रसारमाध्यमातून प्रसारित केली जाते .तेंव्हा त्यात सादरीकरणाच महत्वाच काम हे संकलन करणाऱ्या कडे असते .
FCP7  
संकलन हे माध्यमाप्रमाणे केले जाते . जसे कि , रेडीओवरील संकलन हे फक्त ध्वनी वर केले जाते आणि दूरचित्रवाणीत ऑडीओ आणि व्हीडीओच  संकलन केल जाते.तेव्हा प्रसारमाध्यमांच संकलन हा  पण एक महत्वाचा भाग आहे .   चलचित्राचं संकलन ( विडीओ एडिटिंग )म्हटले कि डोळ्यासमोर येतात ते म्हणजे एफ सी पी आणि प्रीमियर येते .तसेच इतर हि softwares एडिटिंग साठी वापरले जातात .एफ सी पी हे software मुख्यत फक्त आणि फक्त I-MAC / APPLE या OS चे आहे आणि प्रीमियर हे software विंडोवझवर run होते आणि MAC वर हि run होते.  या software मध्ये व्हिडीओ ओडीओ संकलन केल जाते.या दोन्ही software मध्ये काही साम्य आहेत .ते म्हणजे त्यातील काही टूल्स .त्यामध्ये टाईमलाईन , कॅनवास ,व्हीव्हर ,इफेक्ट कंट्रोल इतर असे काही टूल्समध्ये साम्य दिसून येते.जेंव्हा आपण एफ सी पी मध्ये एखादी वीडीओ फाईल इम्पोर्ट करतो.तेंव्हा MOV फाईल फोरमात हा फार सोयीस्कर ठरतो .तर प्रीमियर मध्ये MP4 ,AVI ,WMV असे वीडीओ फाईल आपण इम्पोर्ट केल्याचे सोयीस्कर ठरते.आपण कित्येक वेळा संकलन करतो तेंव्हा वायरस हा काही तांत्रिक अडचणी निर्माण करतो तेंव्हा विंडोज वरील प्रीमियर चा आपला प्रोजेक्ट करप्ट होतो .तेंव्हा आपला वेळ , पैसा खर्च होतोच .पण जेंव्हा आपण एफ सी पी वर एडिटिंग करतो तेंव्हा वायरस च काहीच ताण नसतो कारण एफ सी पी software हे APPLE/IMAC वरच run होते .त्यात आपला प्रोजेक्ट सुरक्षित राहतो .

Adobe premiere Pro
विंडोज वर फक्त प्रीमियर run होतो. एफ सी पी नाही .त्यामुळे चित्रपटसृष्टी मध्ये हि imac चे संगणक वापरले जातात.हे दोन्ही software हाताळताना त्यांचे काही शोर्टकट किइ आहे.प्रीमियर मध्ये विडीओ ओडीओ रेनडर करताना ENTER बटन दाबावे लागते आणि एफ सी पी मध्ये व्हिडीओ आणि ओडीओ रेनडर करताना shift +R आणि Control+R बटन दाबावी लागतात.तसेच , विंडोज मध्ये आपण कित्येक वेळा रेफ्रेश करू शकतो पण imac मध्ये तर रिफ्रेश नावच पर्यायच नसतो .व्हिडीओ एडिटिंग हि लाईव / offline/ Online केले जाते.
एफ सी पी च्या या सोयीस्कर वापरासाठी कित्येक वेळा काही लोकांनी IMAC चे Opreating System आपल्या घरगुती वापरातील विंडोजच्या संगणकात लोड करतात.तेंव्हा ती लोक हार्ड-डिस्क मधील NTFS file सिस्टम काढून टाकतात .त्यामुळे त्या हार्ड-डिस्कमध्ये MAC OS सहज लोड करता येतो .तेंव्हा संगणकात mac लोड करतात.पण mac ला लागणारा CONFIG हा कमी पडतो .जर लोड करण्याआधी ती CONFIGची काळजी घेण्यात आली असेल तर तो mac सुरु होतो .पण कधी कधी संगणक RESTART / SHUTDOWN केल्यानंतर काही वेळा एरोर येतो .
जरी ते OS लोड योग्य प्रकारे झाले आणि  कुठला हि एरोर नाही आला.तेंव्हा काही लोक त्या संगणकासाठी पायरेटेड software install करतात .पण जेंव्हा एखादी व्यक्ती त्याच्या संगणकाला इंटरनेट जोडणी करते तेंव्हा मात्र ते software सुरु होत नाही .तेंव्हा ते LICENCE / registration करायला सांगते.तेंव्हा त्याचे फ्री मध्ये एफ सी पी वापर करायचं स्वप्नाचा चुरा होतो.तेंव्हा त्या वापरकर्त्या समोर दोन पर्याय उरतात ते म्हणजे एक तर ज्या संगणकात एक सी पी install केल आहे.त्याची एकतर इंटरनेट जोडणी न करणे किंवा एफ सी पी च लायसन विकत घेणे .शक्यतो फ्री मध्ये वापरल्यास MAC OS हि त्याची सेवा पूर्ण देत नाही .जसे कि त्यातील MOTION , LiveType ,cinema इतर software एफ सी पीच्या collectiona मध्ये असतात ते बरोबर चालत नाही आणि जर लायसन अधिकृत असेल तर ते collection मधील सगळी softwares मग योग्य प्रकारे हाताळली जातात.

निषेध ! निषेध !! निषेध !!!


निषेध ! निषेध !! निषेध !!!

निषेध ! निषेध !! निषेध !!!



             सध्या  बातम्यात  खूप ठिकाणी  काही थोर महापुरुषांच्या  पुतळ्याच्या  विटंबना होताना  दिसतात .तेंव्हा  फार  मनाला गलिच्छपणा  वाटतो कि , ज्या महापुरुषांनी  देशाला  मोठे योगदान  दिले त्या महापुरुषाची  विटंबना ची बातमी जितक्या वेळा वृत्तपत्रातून ,दूरचित्रवाणी  तसेच इतर माध्यमातून  पोहचते तेंव्हा  मनावर जबरदस्त आघात होतात .हि विटंबना  किती दिवस समाजकंटक  घडविणार ...या अशा सतत  घडणाऱ्या विटंबना  व त्या वरून प्रसारित होणारया  बातम्यावरून तर आता असे वाटते कि सरकार भावना शून्य झाले आहे का ? सतत  विटंबना च्या घटना घडताना दिसतात यावर सरकाने काही तरी ठोस उपाय काढावा जेणे करून महापुरुषाच्या होणारया विटंबनाला आळा तरी बसेल .उदा.पुतळ्यांच्या ठिकाणी सी सी टीव्ही तरी बसवावेत.असे तरी वाटते .
आता तर असे वाटते कि महापुरुषांच्या विटंबना करण्यासाठीच पुतळे उभारले जातात .असे चित्र सध्या उभे होताना दिसते आहे.हे चित्र लवकरात लवकर पुसायची गरज आहे. कारण कि महापुरुषांची पुतळे हि जागो जागी उभारण्यात येतात त्याचे कारण असे कि , त्या महापुरुषांच्या प्रेरणा त्यांचे विचारसारणी त्यांच्यासारखी दूरदृष्टी लोकांनी आत्मसात करावी म्हणून महापुरुषांचे पुतळे जागीजागी उभारले जातात , असे मला वाटते.महापुरुषांची पुतळे नेहमी लोकांना इतिहासातील कामगिरीची जाणीव करून देत असतात.पण सध्याच्या घटना या विटंबनेच्या ऐकून पाहून खूपच आघात होत आहेत.
             महापुरुषाच्या पुतळ्याची घटना सतत घड्तानाच दिसतात .त्यात आता नुकताच घडलेली घटना आपल्याला हि माहितीच असेल.आता पर्यंत भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,आणि छत्रपती शिवाजी महाराज इतर महापुरुषांच्या हि पुतळ्याच्या विटंबना झालेले दिसते.ज्या महापुरुषांची विटंबना झाली ते तर  महाराष्ट्राच्या मातीतलेच होते ना, मग या महापुरुषांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी आहे .तसेच देशासाठीची हि लाजिरवाणी गोष्ट आहे  .
त्यातील काही घटना :
२००८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही सामाजकंटकांनी  केली होती.

२६ जानेवारी २०१० रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती .

२०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील  युसुफपूर गावात काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती .

२०१४ मध्ये  महापालिकेकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची एक प्रकारची विटंबना

असे विकृत प्रकार कधी पर्यंत घडत राहणार .याचा अंदाज हि आता लावण शक्य नाही .काय चाललाय नक्की विटंबना काय पोरखेळ वाटतोय का त्या व्यक्तींना जे असे गलिच्छ प्रकार करतात .अशा व्यक्तींचा  निषेध असो ,अशा  व्यक्तींना पाठींबा देणार्यांचा  हि निषेध असो ,त्याच्या विचारांचा हि निषेध असो...
वेळ आली आहे महापुरुषांच्या योगदानाची उजळणी पुन्हा करून द्यायची .आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा इतिहास कसा घडत गेला आणि कोणामुळे घडत गेला .याचा विसर त्या विटंबना करणाऱ्या सामाज कंटकांना पडलेला दिसतोय.या विटंबनामुळे मग राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहचविन्याचा अपराध हा एखाद्या आतंकवाद्यासारखाच आहे .फक्त आंदोलने करून आणि तोडफोड करून समाजकंटक विटंबना थांबतील असे नाही.आता पर्यंत आपण पाहिलच असेल कि कित्येक तरी वेळा विटंबना झाल्या त्यावर आंदोलने झाली मोठ मोठ्या rally हि निघाल्या पण त्या नंतर हि विटंबना या सुरूच आहेत .याच गोष्टीची लाज वाटते.
आपण हि तितकेच  कारणीभूत आहेत या होणाऱ्या गलिच्छ प्रकाराला.कधी आपण असा विचार केला का ?विटंबना  करणारया समाजकारांटकांना मुळात बळ येते तरी कुठून ?आपण महापुरुषांचे पुतळे रस्त्यांवर , चौफुलीवर उभारताना अनेक पक्षाचे उमेदवार दिसतात .पण ते उमेदवार नंतर त्या पुतळ्यांनाकडे कधी मागे फिरून पाहतच नाही .जेंव्हा त्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी /महापारीनिर्वान असतो तेंव्हाच हे उमेदवार जागी होतात.त्याचं जाऊद्या .पण आपल काय आपल्याला असे वाटत नाही का आपल्या परिसरात एखाद्याने महापुरुषांचा पुतळा उभारला.तेंव्हा त्या पुतळ्याची जबाबदारी आपल्यावर असते हि भावना प्रथम मनात निर्माण होणे गरजेचे आहे.नचुकता त्या त्या परिसरातील एका एका  व्यक्तींनी एक एक हार किंवा फुल जरी अर्पण केले तरी खूप आहे.असे केल्याने  जेणे करून तेथील समाजकंटकांना असे तरी भासेल कि हि लोक जागृत आहे.आणि समाजकंटकी लोकांना विटंबना करण्याआधी १० वेळा विचार करायला भाग पाडू शकू .त्यामुळे विटंबनेसारख्या गल्लीच्छ प्रकाराला आला घालता येईल .
       विटंबना या फक्त महापुरुषांच्या पुतळ्यांची होताणाच दिसत नाही तर लेण्यांची हि  विटंबना झालेली दिसते. १० वर्षां आधी तर मुंबईतील जागतिक कीर्तीचे संजय गांधी उद्यानातील कान्हेरी गुंफेत बुद्धांच्या लेणीची आणि बुद्धांची विटंबना हि होताना दिसली .तेथे महाशिवरात्रीला शिवभक्त मोठ्याप्रमाणावर येत होते आणि भगव्या कपड्यातील महाराज त्यांना बुद्धांच्या स्तुपला शंकराची पिंड म्हणून सांगत असे तेंव्हा नवस करताना ते लेणीच्या आतील मुर्त्यांवर लांबून नारळ फेकून मारत. असे गलिच्छ प्रकार जेंव्हा लेण्यांत घडतात आणि हे प्रकार जेंव्हा परदेशी पर्यटक पाहतात .तेंव्हा आपल्या देशाच्या प्रतिमेच्या विषयीच मत हि कदाचित त्यांच बदलू शकते.हा प्रकार कळताच लोकांचा गैरसमज दूर करून तेंव्हा २००५ मध्ये ती लेणी बौद्ध लेणी म्हणून घोषित करण्यात आली .तेंव्हा तेथील सामाजकंटकच्या त्या गलिच्छ प्रकारला आला घालण्यात आला.

विटंबना करणाऱ्या त्या विचारांचा निषेध असो 
निषेध असो निषेध असो निषेध असो 

Wednesday 8 October 2014

सायबर आतंकवादामुळे सायबर सैनिक एक काळाची गरज



सायबर आतंकवादामुळे 
 सायबर सैनिक एक काळाची गरज 


             जलदल , वायुदल , नौदल ,भूदल या सेनाद्वारे सीमांचे संरक्षण केले जात . पण सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानासोबत संगणक हे एक महत्वाच साधन बनले आहे. या संगणकाचे वापरकर्ते ज्या प्रमाणे चांगला /वाईट वापर करतात.
            तेंव्हा सीमांचे काही महत्वाची माहिती हि संगणकामध्ये साठवून ठेवली जाते तसेच एखाद्या सर्व्हरवर डेटा ठेवण्यात येतो .तेंव्हा संगणकाची सुरक्षितता हि आवश्यक असते मात्र संगणकाचा वाईट वापर करून hakers तो संगणक किंवा ते सर्व्हर HACK करून त्यांची गुप्त माहिती ते जगासमोर आणतात पण त्या माहितीचा प्रसार केल्यामुळे त्या सीमाची सुरक्षितता धोक्यात येते . तेंव्हा क्षेप्नास्त्र , बॉम्ब इ. शास्त्राविना हे युद्ध होते. आतंकवादी मंडळी हि संगणकाद्वारे घरापर्यंत पोहचतात.

सायबर आतंकवाद म्हणजे काय ?

http://mazadrushtikon.blogspot.in/


          सगळ्यांनाच पहिले जागतिक युद्ध आणि दुसरे जागतिक युद्ध माहितीच असेल.सगळेच म्हणतात कि तिसरे जे जागतिक महायुद्ध होणार ते सायबर महायुद्ध होणार . जे संगणकाद्वारे होणार असेच दिसत आहे तेंव्हा सायबर आतंकवाद किंवा युद्ध ची तशी व्याख्या करायला गेले तर फार मोठी आहे.ज्यावेळी दोन देश किंवा दोन देशापेक्षा अधिक देश एकमेकांचे संगणक इंफ्रातस्त्रकचर व सायबर  इंफ्रातस्त्रकचर वर आघात करतात त्याला सायबर युद्ध किंवा सायबर आतंकवाद असे म्हटले जाऊ शकते .
          एखाद्या देशाचे बँकेचे साईटस HACK  करून ते तिसरयाच देशाच्या खात्यात पैसे पाठवून .त्या देशाचे ते आर्थिक नुकसान हि करू शकतात .त्यामुळे कदाचित त्यांचा चलनातील पैसा सुद्धा देशाकडे राहणार नाही.
हा फार मोठा आर्थिक धोका त्या देशाला निर्माण होईल .
          भारतातील पावरची रचना बघितली असता आपल्याकडे सेन्ट्रल पावर ग्रेड कोर्पोरेशन इन इंडिया आहे.आपल्या संपूर्ण राज्यात पावर विकली जाते.त्या पावरचा पुरवठा ते करतात तेंव्हा या साठी ते मोठ मोठे संगणक वापरतात .हे सर्व संगणक इंटरनेटशी जोडलेले असतात .तेंव्हा संगणक hack करून ते संगणकावर ताबा मिळवून ते पावर ग्रेड बंद करू शकतात .तेंव्हा आपल्याकडे पावरची टंचाई निर्माण होईल .
      तसेच, आपले जे दळणवळणाची जी साधन आहेत.ज्याच्यामुळे आपल्याकडे विमान उड्डाण घेतात.त्या संगणकामध्ये शिरकाव करून ते आपली दळणवळणाच्या साधनावर ताबा मिळवून आपल्या दळणवळनात अडथळा निर्माण करू शकतात .त्याच प्रमाणे ते डॉक्टर लोकांचे संगणक hack करून तिथे हि विविध अडथळे निर्माण करू शकतात .सेटलाईटस मध्ये शिरकाव करून सेटलाईट नियंत्रित केल्यास देशाचे जे फायटर विमान आहेत त्यांचा संपर्क तुटेल आणि एक विमानाला दिशा कळणार नाही .त्यामुळे जे जे संगणकाशी जोडलेले आहे ते काही हि आपल नुकसान करू शकतात.एखाद्या देशाचा इंटरनेटशी जोडलेली जुळणी ते बंद करू शकतात . प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम सुद्धा बंद पडू शकतात .
     युरोपातील एस्टोनिया या देशात अशी एकदा घटना घडली होती .तेथील नक्षलवाद्यांनी त्या देशाचा बंद पडला होता.तेंव्हा तो संपूर्ण देश स्थगित झाला होता.अशा भयंकर परिस्थिती उद्भविल्या जातात .
      देशाच्या सायबर सीमांच संरक्षण करता येते. जसे कि भारतातील एन टी आर ओ , डी आर डी ओ अश एजेन्सी आहेत. ज्याद्वारे भारतातील सायबर सीमानच संरक्षण करता येते.भारतच स्वताच असे आपल सायबर कमांड आहे.तेंव्हा तेथील परिक्षा उत्तीर्ण होऊन आपणा हि त्यात काम करू शकतो .तिथे तसे आपणास प्रशिक्षण हि दिले जाते.तेंव्हा आपण सायबर योद्धा म्हणून सायबर हल्ले करणारया सायबर आतंकवादाशी आपण लढू शकतो. म्हणजेच,जसे सैनिक होऊन सीमांच रक्षण केले जाते त्या प्रमाणे आपण सायबर सीमांच संरक्षण आपण करू शकतो.एक सायबर सैनिक म्हणून काम करू शकतो आणि हि काळाची गरज आहे. जसे आपल्याकडे  NATIONAL DEFEANCE ACADEMY आहे .जिथे वेगवेगळ्या प्रकारचे  सैनिक तयार करतो . जसे कि भूदल ,वायुदल ,जलदल    ज्या प्रमाणे आहे तसे आपले सायबर कमांड सायबर सैनिक असणे गरजेचे आहे .ते ही २४ तास सावध असणे गरजेचे आहे .

कायद्यात ६६एफ act ऑफ द आय टी आय ऑफ २००० मध्ये व्यवस्थित दिलेली आहे.त्या कायद्याप्रमाणे,आपल्या देशाचा स्वाभिमान ,सार्वभौमत्व , देशाची सुरक्षितता आणि आपले स्वतंत्र याला हानी पोहचविलयास किवा देशाचे महत्वाचे जे सर्व्हर आहेत .जसे ,कि करचे सर्व्हर ,रेल्वे आरक्षणाचे (रिजर्वेशनचे) सर्व्हर ,  किंवा पावर ग्रेड चे सर्व्हर याचा एक्सेस जर थांबवत असणार तर किवा न्युक्लीअर किंव्हा इस्रो यांच्या संगणकात शिरकाव केल्यास तेथील माहिती चोरल्यास  किंवा सर्व्हर डाऊन केले तर हा कायदा लागू होतो .तसेच शिरकाव करून जर त्यात वायरस सोडला.ज्यामुळे देशाला काही नुकसान पोहचवीत असेल तर त्यावर हा कायदा  लागू होतो.तसेच एखादा मेल फोरवर्ड करताना तो निट फोरवर्ड करावा कधी कधी काही माहिती त्या मेल मध्ये असू शकते जी आपणास हि माहित नसते तेंव्हा काळजीपूर्वक मेल फोरवर्ड करावे.नाही तर आपल्यावर हि सायबर आतंकवादाचा गुन्हा दाखल होतो.
   तसेच , जर google वर जर बॉम्ब कसे बनवावे असे नाशवंत काही शोध घेतला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येते.असा गुगलद्वारे शोध घेतल्यास तो एक प्रकारचा गुन्हा ठरतो .

Tuesday 7 October 2014

सायबर क्राईम



सायबर क्राईम 

        आपण आधुनिक व प्रगत होत चाललो आहोत .तेवढ्याच प्रमाणावर आधुनिक पद्धतीने गुन्हेगारीच प्रमाण सुद्धा वाढत असताना दिसते आहे . आज संगणक हे घरा घरात पोहचलेले माध्यम आहे.पण या संगणकामुळे आणि इंटरनेट मुळे  किती मोठ्या प्रमाणावर गुन्हे हि घडू शकतात याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही .आज या संगणकामुळे इंटरनेटमुळे मानवी जीवनाच्या व्यक्तिकेचा बाजार मांडला गेला आहे.गुन्हा हा गुन्हा असतो .तसेच चोरी ,लुटमार , दरोडे , हत्या त्याचप्रमाणे नवीन उदयाला आलेला गुन्हा म्हणजे सायबर गुन्हा (क्राईम).अगोदर संगणक आणि LAPTOP द्वारे फक्त गुन्हे घडत होते मात्र सध्या विकसनशील तंत्रज्ञानासोबत माध्यमांमध्ये हि बरिच क्रांती घडलेली दिसते.मोबाईल फोन TABLETS या द्वारे हि आता गुन्हे हे उदयास आलेत.त्यामुळे गुन्ह्ण्यांच प्रमाण दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे सायबर गुन्ह्यात पकडले जाणारे आरोपी शक्यतो १८-३० वयोगटातील असतात.त्याचे कारण असे कि शाळेतील मुले महाविद्यालायातील मुले यांना तंत्रज्ञानाविषयीच्या गोष्टी लगेच कळतात आणि त्यात ते निपूर्ण होतात.संगणक,मोबाईल,इंटरनेतसी जुळणारी साधने हि आज च्या तरून पिद्धीचा जीवनातील एक अंग बनला आहे.


          १.सायबर गुन्हा  म्हणजे काय आणि आणि याच्या अंतर्गत गुन्हे :


उ:. संगणक वापरून किंवा इंटरनेट वापरून केलेले गुन्हे त्यात फसवणूक , एखाद्याची बदनामी ,डेटाची चोरी , फिशिंग , पोर्नोग्राफी इतर गुन्ह्याचा सामावेश सायबर गुन्ह्यात होतो.  वाटसअप वरून अश्लील चित्र तसेच राजकीय नेत्यावर आधारित केलेले मेसज तसेच व्हिडीओ पाठविणे.सायबर गुन्हा हा संगणक किवा मोबाईलचे वापरकर्ते नसताना हि त्यांवर सायबर गुन्हा दाखल होऊ शकतो .एका मुलाखती मध्ये प्रशांत माली यांनी असे सांगितले कि,एकदा एक स्त्री अंघोळ करत असताना तिचे काही छायाचित्रे काही मुलांनी काढले आणि ते इंटरनेटद्वारे प्रसारित करण्यात आले होते. तेंव्हा त्या स्त्रीला सुद्धा माहित नव्हते कि तिचे अशा प्रकारचे कोणी छायाचित्रे इंटरनेट माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आल होते .जेंव्हा तिच्यावर सायबर गुन्हा नोंदविण्यात आला तेंव्हा त्या स्त्री ला कळले कि तिचे अशा प्रकारचे अश्लील छायाचित्रे प्रसारित होत आहे. तेंव्हा तिच्या वर हि सायबर गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

मोबाईलवरून येणारे फेक मेसेग/ ई-मेल, ओनलाईन बँकिंगवरून नकळत पैसे ट्रान्स्फर होणे तसेच खरेदी होणे.याचा हि सामावेश सायबर गुन्ह्यात होतो.

जेंव्हा आपण एखादा बँकेचा फोर्ममध्ये माहिती भरतो तेंव्हा फोर्म मध्ये आपण ओनलाईन बँक सुविधा हवी असे काही टिक मार्क तर केले नाही ना याची प्रथम नोंद घ्यावी. जेंव्हा आपले एखादे डेबिट कार्ड किंवा ए टी एम कार्ड बँकेतून आपल्याला वेळेवर मिळाले का ? ते केंव्हा मिळणार याची नोंद जर घेतली नाही तर तेंव्हा ते कार्ड आपले बँकेतच राहते. तेंव्हा तेथील काही पिउन तसेच बँकेचे कनिष्ठ मंडळी तेंव्हा घोटाळा करते .तेंव्हा आपल्याला कळते कि आपण तर काही खरेदी सुद्धा नाही केली तरी आपल्या खात्यातून पैसे वजा कसे झाले हे कळत नाही. तसेच जेंव्हा आपला मोबाईल अचानक बंद होतो.तेंव्हा लगेच आपण बँकेला संपर्क करून त्वरित कळवावे.जेणे करून आपले आर्थिक नुकसान आपण होण्यापासून वाचू शकतो.
त्याचबरोबर क्रेडीट कार्डच क्लोनिंग हा नवीन गुन्हा हि खूप मोठ्या प्रमाणावर सुरु असताना दिसु लागला आहे.जो आपल्या देशातच नव्हे तर परदेशात हि असे गुन्हे घडताना दिसतात.पूर्वी क्रेडीट कार्ड क्लोनिंगची मशीन लागायची स्कॅन करायला पण आता काहि अशा मशीन आल्या आहेत कि जर आपल्या खिशात जरी क्रेडीट कार्ड असेल आणि मशीन फिरवली खिशावरून तरी त्या मशीन मध्ये क्रेडीट कार्ड मधील संपूर्ण माहिती हि चोरली जाते.कारण आपल्याकडे वापरात असणारे क्रेडीट कार्डमध्ये चीप बसवलेली नाही फक्त एक magnetik पट्टी असते त्यामुळे हि माहिती चोरीला जाते .
काही लोकांच असे मत आहे कि सायबर केफे मधून जर गुन्हा केला तर आपला शोध घेणे शक्य नसते असे काही लोकांच मत आहे.पण त्यांना हे माहित नसते कि सायबर कॅफेत हि सी सी टीव्ही बसविलेले असतात .पण ते चालू असतील तर पकडले जाणार पण जर बंद असतील तर कदाचित पकडल्या जाणार नाही.तेंव्हा तिकडचे सी सी टीव्ही जर बंद असेल आणि गुन्हा केला तर शक्यतो पकडले जाऊ शकत नाही असा विचार करता पण जेंव्हा आपण सायबर कॅफेत जातो तेंव्हा आपण सही करतो तर ती सही चुकीची आणि माहिती चुकीची दिली तर कुणाला काय समजत असा विचार कारण चुकीच आहे.प्रत्येक सायबर कॅफेत आपल्याला ओळखपत्र म्हणून लायसन तरी घेतात त्यामुळे सायबर कॅफेत बसून गुन्हा केला तर त्यास पकडणे फार सोयीस्कर ठरते .तेंव्हा पोलिसांना हवी ती माहिती मिळविणे सोयीस्कर ठरते.त्यामुळे तिकडे बसून गुन्हे करणे म्हणजे पोलिसांना आमंत्रण देणे होणे .
आपण जेंव्हा एखाद्या फ्री च्या संकेतस्थळावर भेट देतो तेंव्हा नको त्या विंडो आपल्या संगणकात आपोआप दिसतात तेंव्हा त्या विंडो स्किप कराव्या.तसेच ,त्या फ्री संकेतस्थळे ही आपल्या समोर जाहिराती सादर करत असतात . तसेच जर आपल्या आतून चुकून संगणकाद्वारे गुन्हा झाला तेंव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात . ते म्हणजे आपल्याला जर कॉम्पेजेक्षण हवे असेल तर आपण महाराष्ट्र मंत्रालयामध्ये ऑफिसरकडे सिव्हील तक्रार नोंदवावी  किंवा जवळच्याच पोलीस ठाण्यात जाऊन लगेच तक्रार नोंदवायची . या बद्दल जर त्या पोलिसांना काही काळात नसेल तर आपण आपल्या जिल्ह्यातील सायबर सेल  हि एक प्रकारची सेल बनविली आहे पोलिसांनी तर मग तिकडे जाऊन आपण तक्रार नोंदवायची.तेंव्हा ते शास्त्रसुद्धा पद्धतिने तपास करतात आणि आपल्याला मदत करतात.

Friday 3 October 2014

प्रसारमाध्यमे हि समाजासाठी कि समाज हा प्रसारमाध्यमासाठी

प्रसारमाध्यमे हि समाजासाठी कि समाज हा प्रसारमाध्यमासाठी 


         प्रसारमाध्यमे हि समाजासाठी कि समाज हा प्रसारमाध्यमासाठी या दोन्ही बाबी एकमेकांशी पूरक व परस्परावलंबी आहेत.कारण समाज मानवासिवाय नाही आणि मानव समाजाशिवाय नाही.सर्वात पहिला प्रसारमाध्यमाचा काल आदिमानवाने अनुभवला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अश्मयुगीन काळापासून
आतापर्यंत मानवाचा समाजाचा विकास होत गेला. प्रत्येक युगात माध्यमांची भूमिका महत्वाची राहिली आहे.
मानवी समजाचा विकास ज्या प्रमाणे होणार त्या प्रमाणेच माध्यमांचा होणार आणि एकूणच  माध्यमांचा विकास झाला  म्हणजे मानवाचा विकास मानवाचा विकास म्हणजे समाजाचा विकास असे हे चक्र सुरु राहते. त्यामुळे या दोन्ही बाबी एकमेकांस पूरक आहेत.