Tuesday 14 October 2014

निषेध ! निषेध !! निषेध !!!


निषेध ! निषेध !! निषेध !!!

निषेध ! निषेध !! निषेध !!!



             सध्या  बातम्यात  खूप ठिकाणी  काही थोर महापुरुषांच्या  पुतळ्याच्या  विटंबना होताना  दिसतात .तेंव्हा  फार  मनाला गलिच्छपणा  वाटतो कि , ज्या महापुरुषांनी  देशाला  मोठे योगदान  दिले त्या महापुरुषाची  विटंबना ची बातमी जितक्या वेळा वृत्तपत्रातून ,दूरचित्रवाणी  तसेच इतर माध्यमातून  पोहचते तेंव्हा  मनावर जबरदस्त आघात होतात .हि विटंबना  किती दिवस समाजकंटक  घडविणार ...या अशा सतत  घडणाऱ्या विटंबना  व त्या वरून प्रसारित होणारया  बातम्यावरून तर आता असे वाटते कि सरकार भावना शून्य झाले आहे का ? सतत  विटंबना च्या घटना घडताना दिसतात यावर सरकाने काही तरी ठोस उपाय काढावा जेणे करून महापुरुषाच्या होणारया विटंबनाला आळा तरी बसेल .उदा.पुतळ्यांच्या ठिकाणी सी सी टीव्ही तरी बसवावेत.असे तरी वाटते .
आता तर असे वाटते कि महापुरुषांच्या विटंबना करण्यासाठीच पुतळे उभारले जातात .असे चित्र सध्या उभे होताना दिसते आहे.हे चित्र लवकरात लवकर पुसायची गरज आहे. कारण कि महापुरुषांची पुतळे हि जागो जागी उभारण्यात येतात त्याचे कारण असे कि , त्या महापुरुषांच्या प्रेरणा त्यांचे विचारसारणी त्यांच्यासारखी दूरदृष्टी लोकांनी आत्मसात करावी म्हणून महापुरुषांचे पुतळे जागीजागी उभारले जातात , असे मला वाटते.महापुरुषांची पुतळे नेहमी लोकांना इतिहासातील कामगिरीची जाणीव करून देत असतात.पण सध्याच्या घटना या विटंबनेच्या ऐकून पाहून खूपच आघात होत आहेत.
             महापुरुषाच्या पुतळ्याची घटना सतत घड्तानाच दिसतात .त्यात आता नुकताच घडलेली घटना आपल्याला हि माहितीच असेल.आता पर्यंत भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,आणि छत्रपती शिवाजी महाराज इतर महापुरुषांच्या हि पुतळ्याच्या विटंबना झालेले दिसते.ज्या महापुरुषांची विटंबना झाली ते तर  महाराष्ट्राच्या मातीतलेच होते ना, मग या महापुरुषांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी आहे .तसेच देशासाठीची हि लाजिरवाणी गोष्ट आहे  .
त्यातील काही घटना :
२००८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही सामाजकंटकांनी  केली होती.

२६ जानेवारी २०१० रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती .

२०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील  युसुफपूर गावात काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती .

२०१४ मध्ये  महापालिकेकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची एक प्रकारची विटंबना

असे विकृत प्रकार कधी पर्यंत घडत राहणार .याचा अंदाज हि आता लावण शक्य नाही .काय चाललाय नक्की विटंबना काय पोरखेळ वाटतोय का त्या व्यक्तींना जे असे गलिच्छ प्रकार करतात .अशा व्यक्तींचा  निषेध असो ,अशा  व्यक्तींना पाठींबा देणार्यांचा  हि निषेध असो ,त्याच्या विचारांचा हि निषेध असो...
वेळ आली आहे महापुरुषांच्या योगदानाची उजळणी पुन्हा करून द्यायची .आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा इतिहास कसा घडत गेला आणि कोणामुळे घडत गेला .याचा विसर त्या विटंबना करणाऱ्या सामाज कंटकांना पडलेला दिसतोय.या विटंबनामुळे मग राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहचविन्याचा अपराध हा एखाद्या आतंकवाद्यासारखाच आहे .फक्त आंदोलने करून आणि तोडफोड करून समाजकंटक विटंबना थांबतील असे नाही.आता पर्यंत आपण पाहिलच असेल कि कित्येक तरी वेळा विटंबना झाल्या त्यावर आंदोलने झाली मोठ मोठ्या rally हि निघाल्या पण त्या नंतर हि विटंबना या सुरूच आहेत .याच गोष्टीची लाज वाटते.
आपण हि तितकेच  कारणीभूत आहेत या होणाऱ्या गलिच्छ प्रकाराला.कधी आपण असा विचार केला का ?विटंबना  करणारया समाजकारांटकांना मुळात बळ येते तरी कुठून ?आपण महापुरुषांचे पुतळे रस्त्यांवर , चौफुलीवर उभारताना अनेक पक्षाचे उमेदवार दिसतात .पण ते उमेदवार नंतर त्या पुतळ्यांनाकडे कधी मागे फिरून पाहतच नाही .जेंव्हा त्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी /महापारीनिर्वान असतो तेंव्हाच हे उमेदवार जागी होतात.त्याचं जाऊद्या .पण आपल काय आपल्याला असे वाटत नाही का आपल्या परिसरात एखाद्याने महापुरुषांचा पुतळा उभारला.तेंव्हा त्या पुतळ्याची जबाबदारी आपल्यावर असते हि भावना प्रथम मनात निर्माण होणे गरजेचे आहे.नचुकता त्या त्या परिसरातील एका एका  व्यक्तींनी एक एक हार किंवा फुल जरी अर्पण केले तरी खूप आहे.असे केल्याने  जेणे करून तेथील समाजकंटकांना असे तरी भासेल कि हि लोक जागृत आहे.आणि समाजकंटकी लोकांना विटंबना करण्याआधी १० वेळा विचार करायला भाग पाडू शकू .त्यामुळे विटंबनेसारख्या गल्लीच्छ प्रकाराला आला घालता येईल .
       विटंबना या फक्त महापुरुषांच्या पुतळ्यांची होताणाच दिसत नाही तर लेण्यांची हि  विटंबना झालेली दिसते. १० वर्षां आधी तर मुंबईतील जागतिक कीर्तीचे संजय गांधी उद्यानातील कान्हेरी गुंफेत बुद्धांच्या लेणीची आणि बुद्धांची विटंबना हि होताना दिसली .तेथे महाशिवरात्रीला शिवभक्त मोठ्याप्रमाणावर येत होते आणि भगव्या कपड्यातील महाराज त्यांना बुद्धांच्या स्तुपला शंकराची पिंड म्हणून सांगत असे तेंव्हा नवस करताना ते लेणीच्या आतील मुर्त्यांवर लांबून नारळ फेकून मारत. असे गलिच्छ प्रकार जेंव्हा लेण्यांत घडतात आणि हे प्रकार जेंव्हा परदेशी पर्यटक पाहतात .तेंव्हा आपल्या देशाच्या प्रतिमेच्या विषयीच मत हि कदाचित त्यांच बदलू शकते.हा प्रकार कळताच लोकांचा गैरसमज दूर करून तेंव्हा २००५ मध्ये ती लेणी बौद्ध लेणी म्हणून घोषित करण्यात आली .तेंव्हा तेथील सामाजकंटकच्या त्या गलिच्छ प्रकारला आला घालण्यात आला.

विटंबना करणाऱ्या त्या विचारांचा निषेध असो 
निषेध असो निषेध असो निषेध असो 

No comments:

Post a Comment