Friday, 17 October 2014

Hacking एक व्यसन

Hacking एक व्यसन





     माणसाला ज्या प्रमाणे तंबाखू ,गुटखा ,धुम्रपान ,मद्यपान,Drux ई.चा सेवन करणाऱ्या व्यक्तीस आपण व्यसनी बोलतो.या व्यसनी लोकांना शारीरिक इजा पोहचतात.त्यात त्याचं स्वताचाच नुकसान ते स्वतच्या हातून करून घेतात .
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन            Hacking करणारा व्यक्ती हा स्वताला हुशार समजत असतो .तो नव नवीन शोध घेत राहतो .त्या तंत्रातील उणीवा जाणून घेतो .Hacking करणारी व्यक्ती तितकीच व्यसनी असते जितकी एखादी बिडी पिणारी व्यक्ती बिडीसाठी असते.ज्या  प्रमाणे एखाद्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला एखादा दिवसी धुम्रपान न केल्यास राहवत नाही .त्या प्रमाणेच Hackers ला हि एखादा दिवस Hacking केल्याशिवाय राहवत नाही .
      बिनव्यसनी व्यक्ती व्यसन करणाऱ्या एखादाला पाहूनच व्यसनी बनते .मग ते टीव्ही वर एखादा अभिनेता असो वा घरातील कोणी नातेवाईक अथवा मित्र .ते व्यसन करताना पाहून बिनव्यसनी व्यक्तीच्या हि मनात येते कि काय मिळते यांना व्यसन करून आपण हि एकदा धुम्रपान करून बघूया असा विचार मनात येतो.तेंव्हा सुरुवातीला ठसका जो लागतो तो जीवघेणा वाटतो .तो लागणारा ठसका आपल्याला सावध करते शरीरास धोका आहे म्हणून पण तरी हि त्या ठसक्य नंतर ते व्यसन करावे कि नाही हा विचार त्या व्यक्तीच्या विचारसरणी वरून ठरतो.जर त्याला धुम्रपान करावेसे वाटले तर तो मग त्याचे दुष्परिणाम माहित असून सुद्धा धुम्रपान करु लागतो .
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन       तसेच जर Hackingचा विचार केला असता हकिंग चे व्यसन हि एखाद्या व्यक्तीला तेंव्हाच लागते जेंव्हा टी व्यक्ती एखाद्याला व्यसन ते करताना पाहते .Hacking हे व्यसन हुशार आणि कपाळकरंट्या विद्यार्थ्याला हि लागते.त्याला कारणीभूत आहे.सध्याच तांत्रिक युग.नवनवीन Gadget वापरून पाहन तसेच दुसरयाला समजन्या आधी स्वत त्यात पारंगत होणे आणि त्यातील उणीवा कमी पणा सांगणे .असा विचारसरणी असणारे लोक जास्त करून Hackingचे व्यसनी बनतात .मग ते फ्री इंटरनेट कसे मिळवायचे ? मोबाईल फोन ट्रेस कसा करायचा ? वेबसाईटचा DATA BASE कसा बदलायचा ? Malware कसा रन करायचा कसा बनवायचा ? दुरयाचे अकाऊन्त कसे वापरायचे? असे अनेक प्रश्नाची उत्तर शोधण्याची जशी सुरुवात होते तसे तसे हे व्यसन त्या व्यक्तीस जडायला लागते .मग गुगलवर शोध घेते ती व्यक्ती तेंव्हा गुगल वरील प्रात्यक्षिके पाहून ती व्यक्ती प्रात्यक्षिकाप्रमाणे हि करून पाहते.पण कित्येकदा असे संपूर्ण ज्ञान नसताना काही आज्ञायन Hackers पकडले जातात .त्यांचे आयपी ब्लॉक केले जातात. जेंव्हा ते पकडले जातात तेंव्हा त्यांची अवस्था बिनव्यास्नी व्यक्तीला धुम्रपान करताना लागलेला पहिला ठसका अशी अवस्था असते.तेंव्हा पुन्हा Hacking करायची कि नाही हा विचार त्या व्यक्तीने गरजेचे असते .मात्र कित्येक वेळा काही व्यक्ती Hacking करणे बंद करतात पकडल्या गेल्या नंतर .पण काही व्यक्तींना त्या Hacking विषयी कुतुहूल ,अजून जाणून घेण्याची
mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन इच्छाशक्ती प्रबळ होते तेंव्हा त्या व्यक्ती हकिंगला पुन्हा सुरुवात करतात.तेंव्हा त्यांना एक प्रश्न पडलेला असतो कि अचूक पणे Hacking कशी करता येईल मग ती व्यक्ती एका सायबर ग्रुपला जॉईन होते .मग खरया अर्थाने Hacking ती व्यक्ती सुरुवात करते.मग ज्या प्रमाणे जास्त धूम्रपानाने त्या व्यसनी व्यक्तीला कर्करोग होतो जो हळू हळू जीव घेतो .त्या प्रमाणेच Hacking चे आहे .कित्येकदा Hacking करणाऱ्या व्यक्ती व्यक्तीमध्ये भांडणे होतात मग ती भांडणे सीमा पातळीची असतात तर काही प्रादेशिक आंतरराष्ट्रीय हि असतात . जस जसे व्यक्ती Hacking मध्ये पारंगत होते तसं तसे ती व्यक्ती केंव्हा जागतिक पातळीची Hacking करायला लागते हे त्या व्यक्तीला हि कळत नाही.त्य प्रमाणे धुम्रपान करणारी व्यक्तीने कधी सिगरेटचा BRRAND बदलला हे त्याला कळत नाही..
       मग कधी चुकून त्या व्यक्तीचा MAC IP / ACESS Crack  हा Ethical Hackersला कळतो मग संपूर्ण जग त्या व्यक्तीच्या मागे लागते .जसे कर्करोग त्या  धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागतो .एके दिवसी मग कर्करोग त्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा बळी घेतो त्या प्रमाणेच Hacking करणाऱ्या व्यक्तीच संपूर्ण आयुष्य धोक्यात येते . द्रकस घेणारया व्यक्तीने जर एके दिवसी द्रक्स घेतले नाही तर त्याची जी मानसिक अवस्था होते तशीच अवस्था Hacking करणाऱ्या व्यक्तीने Hacking करण थांबविल्यावर त्या हकेरची होते .कारण Hacking करणाऱ्या व्यक्तीच Hacking हे एक passion बनलेलं असते आणि एक व्यसन.त्या समोर फक्त Coding,Programing vernabliety , Bugs,how to get new Method आणि Tricks इतकेच त्याच्या डोळ्यासमोर असते.Hacking हे इतके वाईट व्यसन आहे जे करताना सापडले तर कारावास होतोच त्याच बरोबर आर्थिक नुकसान भरून द्यावे लागते आणि सर्वात मोठे नुकसान असे कि न्यायालय आपले सारे प्रमाणपत्र निकामी करतात आणि काहींनी त्या व्यसनात अति व्यसन करून पाहता मोठ्या जागतिक पातळीचा गुन्हात सापडता काही वेळा अशा हच्कर ला स्वताच जीव हि गमवावा लागला .        

mazadrushtikon Blog : Hacking एक व्यसन
Hacking हे व्यसन वाईट आहे असे मी म्हणत नाही फक्त इतकेच सांगू इच्छितो कि Hacking करायला आवडत ना तुम्हाला तेंव्हा इतकाच विचार करा कि ज्या व्यक्तीने ते Software ,वेबसाईट बनविताना आलेले कष्टाचा हि विचार करावा.आपल्या देशाचा गुप्त डेटा सुरक्षित कसा ठेवता येईल त्याचा विचार करावा .हे सर्व काम आपण सरकार मान्य करू शकतो .तेंव्हा आपण सायबर सुरक्षा पाहणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन सायबर सैनिक म्हणून काम करू शकाल.आणि ते व्यसन तेंव्हा देशाच्या हितासाठी सोयीस्कर ठरेल .तेंव्हा हे एक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जोडीने तुलना करताना लोक हि तुलना करण्या आधी विचार करतील .

©copyrights Reserved by mazadrushtikon.blogspot.in

No comments:

Post a Comment