Wednesday, 8 October 2014

सायबर आतंकवादामुळे सायबर सैनिक एक काळाची गरज



सायबर आतंकवादामुळे 
 सायबर सैनिक एक काळाची गरज 


             जलदल , वायुदल , नौदल ,भूदल या सेनाद्वारे सीमांचे संरक्षण केले जात . पण सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानासोबत संगणक हे एक महत्वाच साधन बनले आहे. या संगणकाचे वापरकर्ते ज्या प्रमाणे चांगला /वाईट वापर करतात.
            तेंव्हा सीमांचे काही महत्वाची माहिती हि संगणकामध्ये साठवून ठेवली जाते तसेच एखाद्या सर्व्हरवर डेटा ठेवण्यात येतो .तेंव्हा संगणकाची सुरक्षितता हि आवश्यक असते मात्र संगणकाचा वाईट वापर करून hakers तो संगणक किंवा ते सर्व्हर HACK करून त्यांची गुप्त माहिती ते जगासमोर आणतात पण त्या माहितीचा प्रसार केल्यामुळे त्या सीमाची सुरक्षितता धोक्यात येते . तेंव्हा क्षेप्नास्त्र , बॉम्ब इ. शास्त्राविना हे युद्ध होते. आतंकवादी मंडळी हि संगणकाद्वारे घरापर्यंत पोहचतात.

सायबर आतंकवाद म्हणजे काय ?

http://mazadrushtikon.blogspot.in/


          सगळ्यांनाच पहिले जागतिक युद्ध आणि दुसरे जागतिक युद्ध माहितीच असेल.सगळेच म्हणतात कि तिसरे जे जागतिक महायुद्ध होणार ते सायबर महायुद्ध होणार . जे संगणकाद्वारे होणार असेच दिसत आहे तेंव्हा सायबर आतंकवाद किंवा युद्ध ची तशी व्याख्या करायला गेले तर फार मोठी आहे.ज्यावेळी दोन देश किंवा दोन देशापेक्षा अधिक देश एकमेकांचे संगणक इंफ्रातस्त्रकचर व सायबर  इंफ्रातस्त्रकचर वर आघात करतात त्याला सायबर युद्ध किंवा सायबर आतंकवाद असे म्हटले जाऊ शकते .
          एखाद्या देशाचे बँकेचे साईटस HACK  करून ते तिसरयाच देशाच्या खात्यात पैसे पाठवून .त्या देशाचे ते आर्थिक नुकसान हि करू शकतात .त्यामुळे कदाचित त्यांचा चलनातील पैसा सुद्धा देशाकडे राहणार नाही.
हा फार मोठा आर्थिक धोका त्या देशाला निर्माण होईल .
          भारतातील पावरची रचना बघितली असता आपल्याकडे सेन्ट्रल पावर ग्रेड कोर्पोरेशन इन इंडिया आहे.आपल्या संपूर्ण राज्यात पावर विकली जाते.त्या पावरचा पुरवठा ते करतात तेंव्हा या साठी ते मोठ मोठे संगणक वापरतात .हे सर्व संगणक इंटरनेटशी जोडलेले असतात .तेंव्हा संगणक hack करून ते संगणकावर ताबा मिळवून ते पावर ग्रेड बंद करू शकतात .तेंव्हा आपल्याकडे पावरची टंचाई निर्माण होईल .
      तसेच, आपले जे दळणवळणाची जी साधन आहेत.ज्याच्यामुळे आपल्याकडे विमान उड्डाण घेतात.त्या संगणकामध्ये शिरकाव करून ते आपली दळणवळणाच्या साधनावर ताबा मिळवून आपल्या दळणवळनात अडथळा निर्माण करू शकतात .त्याच प्रमाणे ते डॉक्टर लोकांचे संगणक hack करून तिथे हि विविध अडथळे निर्माण करू शकतात .सेटलाईटस मध्ये शिरकाव करून सेटलाईट नियंत्रित केल्यास देशाचे जे फायटर विमान आहेत त्यांचा संपर्क तुटेल आणि एक विमानाला दिशा कळणार नाही .त्यामुळे जे जे संगणकाशी जोडलेले आहे ते काही हि आपल नुकसान करू शकतात.एखाद्या देशाचा इंटरनेटशी जोडलेली जुळणी ते बंद करू शकतात . प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम सुद्धा बंद पडू शकतात .
     युरोपातील एस्टोनिया या देशात अशी एकदा घटना घडली होती .तेथील नक्षलवाद्यांनी त्या देशाचा बंद पडला होता.तेंव्हा तो संपूर्ण देश स्थगित झाला होता.अशा भयंकर परिस्थिती उद्भविल्या जातात .
      देशाच्या सायबर सीमांच संरक्षण करता येते. जसे कि भारतातील एन टी आर ओ , डी आर डी ओ अश एजेन्सी आहेत. ज्याद्वारे भारतातील सायबर सीमानच संरक्षण करता येते.भारतच स्वताच असे आपल सायबर कमांड आहे.तेंव्हा तेथील परिक्षा उत्तीर्ण होऊन आपणा हि त्यात काम करू शकतो .तिथे तसे आपणास प्रशिक्षण हि दिले जाते.तेंव्हा आपण सायबर योद्धा म्हणून सायबर हल्ले करणारया सायबर आतंकवादाशी आपण लढू शकतो. म्हणजेच,जसे सैनिक होऊन सीमांच रक्षण केले जाते त्या प्रमाणे आपण सायबर सीमांच संरक्षण आपण करू शकतो.एक सायबर सैनिक म्हणून काम करू शकतो आणि हि काळाची गरज आहे. जसे आपल्याकडे  NATIONAL DEFEANCE ACADEMY आहे .जिथे वेगवेगळ्या प्रकारचे  सैनिक तयार करतो . जसे कि भूदल ,वायुदल ,जलदल    ज्या प्रमाणे आहे तसे आपले सायबर कमांड सायबर सैनिक असणे गरजेचे आहे .ते ही २४ तास सावध असणे गरजेचे आहे .

कायद्यात ६६एफ act ऑफ द आय टी आय ऑफ २००० मध्ये व्यवस्थित दिलेली आहे.त्या कायद्याप्रमाणे,आपल्या देशाचा स्वाभिमान ,सार्वभौमत्व , देशाची सुरक्षितता आणि आपले स्वतंत्र याला हानी पोहचविलयास किवा देशाचे महत्वाचे जे सर्व्हर आहेत .जसे ,कि करचे सर्व्हर ,रेल्वे आरक्षणाचे (रिजर्वेशनचे) सर्व्हर ,  किंवा पावर ग्रेड चे सर्व्हर याचा एक्सेस जर थांबवत असणार तर किवा न्युक्लीअर किंव्हा इस्रो यांच्या संगणकात शिरकाव केल्यास तेथील माहिती चोरल्यास  किंवा सर्व्हर डाऊन केले तर हा कायदा लागू होतो .तसेच शिरकाव करून जर त्यात वायरस सोडला.ज्यामुळे देशाला काही नुकसान पोहचवीत असेल तर त्यावर हा कायदा  लागू होतो.तसेच एखादा मेल फोरवर्ड करताना तो निट फोरवर्ड करावा कधी कधी काही माहिती त्या मेल मध्ये असू शकते जी आपणास हि माहित नसते तेंव्हा काळजीपूर्वक मेल फोरवर्ड करावे.नाही तर आपल्यावर हि सायबर आतंकवादाचा गुन्हा दाखल होतो.
   तसेच , जर google वर जर बॉम्ब कसे बनवावे असे नाशवंत काही शोध घेतला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येते.असा गुगलद्वारे शोध घेतल्यास तो एक प्रकारचा गुन्हा ठरतो .

No comments:

Post a Comment