Tuesday, 7 October 2014

सायबर क्राईम



सायबर क्राईम 

        आपण आधुनिक व प्रगत होत चाललो आहोत .तेवढ्याच प्रमाणावर आधुनिक पद्धतीने गुन्हेगारीच प्रमाण सुद्धा वाढत असताना दिसते आहे . आज संगणक हे घरा घरात पोहचलेले माध्यम आहे.पण या संगणकामुळे आणि इंटरनेट मुळे  किती मोठ्या प्रमाणावर गुन्हे हि घडू शकतात याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही .आज या संगणकामुळे इंटरनेटमुळे मानवी जीवनाच्या व्यक्तिकेचा बाजार मांडला गेला आहे.गुन्हा हा गुन्हा असतो .तसेच चोरी ,लुटमार , दरोडे , हत्या त्याचप्रमाणे नवीन उदयाला आलेला गुन्हा म्हणजे सायबर गुन्हा (क्राईम).अगोदर संगणक आणि LAPTOP द्वारे फक्त गुन्हे घडत होते मात्र सध्या विकसनशील तंत्रज्ञानासोबत माध्यमांमध्ये हि बरिच क्रांती घडलेली दिसते.मोबाईल फोन TABLETS या द्वारे हि आता गुन्हे हे उदयास आलेत.त्यामुळे गुन्ह्ण्यांच प्रमाण दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे सायबर गुन्ह्यात पकडले जाणारे आरोपी शक्यतो १८-३० वयोगटातील असतात.त्याचे कारण असे कि शाळेतील मुले महाविद्यालायातील मुले यांना तंत्रज्ञानाविषयीच्या गोष्टी लगेच कळतात आणि त्यात ते निपूर्ण होतात.संगणक,मोबाईल,इंटरनेतसी जुळणारी साधने हि आज च्या तरून पिद्धीचा जीवनातील एक अंग बनला आहे.


          १.सायबर गुन्हा  म्हणजे काय आणि आणि याच्या अंतर्गत गुन्हे :


उ:. संगणक वापरून किंवा इंटरनेट वापरून केलेले गुन्हे त्यात फसवणूक , एखाद्याची बदनामी ,डेटाची चोरी , फिशिंग , पोर्नोग्राफी इतर गुन्ह्याचा सामावेश सायबर गुन्ह्यात होतो.  वाटसअप वरून अश्लील चित्र तसेच राजकीय नेत्यावर आधारित केलेले मेसज तसेच व्हिडीओ पाठविणे.सायबर गुन्हा हा संगणक किवा मोबाईलचे वापरकर्ते नसताना हि त्यांवर सायबर गुन्हा दाखल होऊ शकतो .एका मुलाखती मध्ये प्रशांत माली यांनी असे सांगितले कि,एकदा एक स्त्री अंघोळ करत असताना तिचे काही छायाचित्रे काही मुलांनी काढले आणि ते इंटरनेटद्वारे प्रसारित करण्यात आले होते. तेंव्हा त्या स्त्रीला सुद्धा माहित नव्हते कि तिचे अशा प्रकारचे कोणी छायाचित्रे इंटरनेट माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आल होते .जेंव्हा तिच्यावर सायबर गुन्हा नोंदविण्यात आला तेंव्हा त्या स्त्री ला कळले कि तिचे अशा प्रकारचे अश्लील छायाचित्रे प्रसारित होत आहे. तेंव्हा तिच्या वर हि सायबर गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

मोबाईलवरून येणारे फेक मेसेग/ ई-मेल, ओनलाईन बँकिंगवरून नकळत पैसे ट्रान्स्फर होणे तसेच खरेदी होणे.याचा हि सामावेश सायबर गुन्ह्यात होतो.

जेंव्हा आपण एखादा बँकेचा फोर्ममध्ये माहिती भरतो तेंव्हा फोर्म मध्ये आपण ओनलाईन बँक सुविधा हवी असे काही टिक मार्क तर केले नाही ना याची प्रथम नोंद घ्यावी. जेंव्हा आपले एखादे डेबिट कार्ड किंवा ए टी एम कार्ड बँकेतून आपल्याला वेळेवर मिळाले का ? ते केंव्हा मिळणार याची नोंद जर घेतली नाही तर तेंव्हा ते कार्ड आपले बँकेतच राहते. तेंव्हा तेथील काही पिउन तसेच बँकेचे कनिष्ठ मंडळी तेंव्हा घोटाळा करते .तेंव्हा आपल्याला कळते कि आपण तर काही खरेदी सुद्धा नाही केली तरी आपल्या खात्यातून पैसे वजा कसे झाले हे कळत नाही. तसेच जेंव्हा आपला मोबाईल अचानक बंद होतो.तेंव्हा लगेच आपण बँकेला संपर्क करून त्वरित कळवावे.जेणे करून आपले आर्थिक नुकसान आपण होण्यापासून वाचू शकतो.
त्याचबरोबर क्रेडीट कार्डच क्लोनिंग हा नवीन गुन्हा हि खूप मोठ्या प्रमाणावर सुरु असताना दिसु लागला आहे.जो आपल्या देशातच नव्हे तर परदेशात हि असे गुन्हे घडताना दिसतात.पूर्वी क्रेडीट कार्ड क्लोनिंगची मशीन लागायची स्कॅन करायला पण आता काहि अशा मशीन आल्या आहेत कि जर आपल्या खिशात जरी क्रेडीट कार्ड असेल आणि मशीन फिरवली खिशावरून तरी त्या मशीन मध्ये क्रेडीट कार्ड मधील संपूर्ण माहिती हि चोरली जाते.कारण आपल्याकडे वापरात असणारे क्रेडीट कार्डमध्ये चीप बसवलेली नाही फक्त एक magnetik पट्टी असते त्यामुळे हि माहिती चोरीला जाते .
काही लोकांच असे मत आहे कि सायबर केफे मधून जर गुन्हा केला तर आपला शोध घेणे शक्य नसते असे काही लोकांच मत आहे.पण त्यांना हे माहित नसते कि सायबर कॅफेत हि सी सी टीव्ही बसविलेले असतात .पण ते चालू असतील तर पकडले जाणार पण जर बंद असतील तर कदाचित पकडल्या जाणार नाही.तेंव्हा तिकडचे सी सी टीव्ही जर बंद असेल आणि गुन्हा केला तर शक्यतो पकडले जाऊ शकत नाही असा विचार करता पण जेंव्हा आपण सायबर कॅफेत जातो तेंव्हा आपण सही करतो तर ती सही चुकीची आणि माहिती चुकीची दिली तर कुणाला काय समजत असा विचार कारण चुकीच आहे.प्रत्येक सायबर कॅफेत आपल्याला ओळखपत्र म्हणून लायसन तरी घेतात त्यामुळे सायबर कॅफेत बसून गुन्हा केला तर त्यास पकडणे फार सोयीस्कर ठरते .तेंव्हा पोलिसांना हवी ती माहिती मिळविणे सोयीस्कर ठरते.त्यामुळे तिकडे बसून गुन्हे करणे म्हणजे पोलिसांना आमंत्रण देणे होणे .
आपण जेंव्हा एखाद्या फ्री च्या संकेतस्थळावर भेट देतो तेंव्हा नको त्या विंडो आपल्या संगणकात आपोआप दिसतात तेंव्हा त्या विंडो स्किप कराव्या.तसेच ,त्या फ्री संकेतस्थळे ही आपल्या समोर जाहिराती सादर करत असतात . तसेच जर आपल्या आतून चुकून संगणकाद्वारे गुन्हा झाला तेंव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात . ते म्हणजे आपल्याला जर कॉम्पेजेक्षण हवे असेल तर आपण महाराष्ट्र मंत्रालयामध्ये ऑफिसरकडे सिव्हील तक्रार नोंदवावी  किंवा जवळच्याच पोलीस ठाण्यात जाऊन लगेच तक्रार नोंदवायची . या बद्दल जर त्या पोलिसांना काही काळात नसेल तर आपण आपल्या जिल्ह्यातील सायबर सेल  हि एक प्रकारची सेल बनविली आहे पोलिसांनी तर मग तिकडे जाऊन आपण तक्रार नोंदवायची.तेंव्हा ते शास्त्रसुद्धा पद्धतिने तपास करतात आणि आपल्याला मदत करतात.

No comments:

Post a Comment