बुद्ध म्हणजे काय ?
बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा ; सम्यकसंबुद्ध , किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा तसेच त्यांस सर्वज्ञ किंवा अमर्याद ज्ञानी असे हि म्हणतात . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे नाव आहे .मनाची अशी अवस्था कि , जी मानसिक विकासाच्या अति उच्च शिखरावर पोहचलेली आहे.बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपुर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते .बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करीत .दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत , त्यानंतर सम्यक संबुद्ध होत.
पहिल्या अवस्थेत मुदिता (आनंद ) दुसरया अवस्थेत विमलता (शुद्धता) त्यानंतर प्रभाकारी (तेजस्विता) , अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) , सुदूर्जया (जिंकण्यास कठीण) , अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), दुर जाणे , अचल (अढळ ) , साधुमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे ) आणि दहाव्या अवस्थेत धर्ममेध जाऊन त्यांस बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते .तेव्हा त्यांस बुद्ध म्हणतात